बीटाची कोशिंबीर – २
साहित्य :
एक मोठे बिट, अर्धी वाटी गोड दही, पाव वाटी दाण्याचे कूट , एक हिरवी मिरची, मोहरीची फोडणी, चवीनुसार मीठ
कृती :
बीटचे साल काढून बिट चांगले किसून घ्यावे. त्यात वरील सर्व साहित्य टाकून मिक्स करणे. हिरवी मिरची तुकडे करून त्यात टाकावी आणि मोहरीची तेलात फोडणी करून कोशिंबिरीमध्ये मिक्स करावी.
खास टिप्स :
* हि कोशिंबीर गारसुद्धा चांगली लागते.
* या कोशिंबिरीत दाण्याचे कूट न टाकता, फक्त दही,मीठ आणि किंचित साखर टाकल्यास हि चांगली लागते.
* या कोशिंबीरचे फायबर कन्टेन्ट वाढवण्यासाठी यामध्ये भिजवलेल्या चिया सीड्स सुद्धा टाकता येतील आणि त्या या कोशिंबिरीमध्ये चवीला हि चांगल्या लागतात.
* दही नाही टाकले तरी हि कोशिंबीर चांगली लागते.