दिवाळी म्हणजे आप्तस्वकीय यांच्या भेटीगाठी घेण्याचा, चमचमीत फराळावर ताव मारण्याचा सण.
पण या दिवाळीमध्ये तुमच्याकडे पाहुणे आल्यास त्यांना झटपट ‘ हि ‘ मिठाई बनवून द्या. पाहुणे एकदम खुश होतील आणि तुमची स्तुती करत राहतील.
दिवाळीच्या दिवसांमध्ये पाहुणे राहुणे यांची वर्दळ असतेच. अश्या वेळेस नेहमीच्या फराळापेक्षा काही वेगळे करावेसे वाटते. पण असे काही जे पटकन तयार करता येईल आणि सगळ्यांना आवडेल.
म्हणून आज आम्ही अशी रेसिपी सांगणार आहोत जी सगळ्यांना आवडेलच आणि झटपट सुद्धा होईल. शिवाय बाजारापेक्षा कमी किमतीत तयार होईल.
तर हि मिठाई आहे सगळ्यांना आवडणारी ” काजु कतली ”
काजु कतली कशी बनवायची
Kaju katli recipe
साहित्य :
१ कप काजू , १ चमचा तुप, अर्धा कप साखर, १/४ कप पाणी
कृती :
काजु कतली बनवण्यासाठी काजुची मिक्सरमध्ये भरडसर पावडर करून घेणे.
एका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून त्यात साखर आणि पाणी टाकून साखरेचा एकतारी पाक बनवून घेणे. याला साधारण ३-४ मिनटे लागू शकतात. पाक करपू नये म्हणून सतत हलवत राहणे.
पाक हातावर घेऊन एकतारी झाला का नाही ते चेक करणे. आणि झाला असल्यास त्यात फिरवलेली काजू पावडर टाकून हलवून चांगला गोळा बनेल असे एखाद मिनिट परतवणे.
एका बटर पेपरवर तो गोळा पसरवून त्यावर दुसरा बटरपेपर झाकणे आणि वरून लाटण्याने लाटून मग त्याच्या वडया पाडणे.
तुम्हाला आवडत असल्यास यावर चांदीचा वर्ख हि तुम्ही लावू शकता. यामुळे मिठाईच्या दुकानात मिळते तशीच हि काजू कतली दिसेल.
पण हि काजु कतली (kaju katli for diwali) घरी केल्यामुळे जास्त चविष्ट आणि स्वच्छ वातावरणात बनलेली असल्यामुळे आपल्या हि मनात कोणत्याही भेसळीची शंका राहणार नाही. आणि आपण पाहुण्यांसोबत मनसोक्तपणे या काजु कतलीचा आस्वाद घेऊ शकाल.