गुलाबजाम कसे बनवावे | Gulabjaam recipe in marathi

गुलाबजाम 

साहित्य :

पाव किलो खवा, अर्धी वाटी मैदा (किंवा आरारूट पावडर), दोन चमचे मिल्क पावडर, चिमूटभर सोडा, तीन वाट्या साखर, तळण्यासाठी तेल / तूप 

gulabjaam recipe in marathi
gulabjaam recipe

कृती :

how to make gulabjamun at home

खवा हाताने थोडा मोकळा करून थोडा कुस्करून घ्यावा. त्यात चाळलेला मैदा, मिल्क पावडर आणि सोडा घालून थोडा पाण्याचा हात लावून चांगले मळावे. हा गोळा थोडा घट्ट वाटल्यास आणखी किंचित पाण्याचा हात लावून थोडे मळून घ्यावे.

या गोळ्याचे आता आपल्या आवडीनुसार गोल किंवा लांबट गोळे करावे. मंद आचेवर तेल किंवा तूप तळण्यासाठी ठेवावे. तेल/ तूप चांगले तापल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यात हे गोळे हळुवार सोडावे. मंद आचेवर लालसर रंगाचे होईपर्यंत तळावे. 

साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. (एकतारी पाक करण्याची कृती इथे वाचा)

त्या पाकात हे तळलेले गोळे सोडावे. गुलाबजाम पाकात बुडले पाहिजे एवढा हा पाक असावा.

आपल्या आवडीनुसार हा पाक बनवतांना केसर किंवा वेलचीपूड आपण टाकू शकतात. 

खास टिप्स : 

*  गुलाबजामसाठी खवा मळतांना खवा थोडासा भाजून गार करावा. मग त्याचे गोल वळल्यास चव आणखी चांगली येते. 

* गुलाबजाम आदल्या दिवशी करून ठेवल्यास पाकात चांगले मुरतात आणि चवीला आणखी चांगले लागतात. 

* गुलाबजाम साठी खव्याचे गोळे वळतांना त्यात मध्यभागी आपल्या आवडीनुसार काजूचा एखादा तुकडा आपण ठेवू शकतात. याने चव हि चांगली लागेल आणि गुलाबजाम नेहमीपेक्षा वेगळे हि होतील. घरच्या पार्टीसाठी गुलाबजाम करतांना आपण हि टीप नक्की वापरून बघा.    


नक्की वाचावे असे :

केळीची कोशिंबीर