खमंग काकडी

खमंग काकडी

साहित्य : 

काकडी पाव किलो, दाण्याचे कूट अर्धी वाटी, गोड दही, एक छोटा चमचा मीठ, मोठा चमचा साखर, अर्धे लिंबू, फोडणीसाठी एक चमचा तूप आणि दोन हिरव्या मिरच्या 

कृती : 

काकडीची साले काढून घ्यावी आणि काकडी किसून त्याचे पाणी पिळून काढून टाकावे. त्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर, कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करावे. दह्यातले पाणी काढून घट्ट दही त्यात मिक्स करावे. 

तुपात जिरे आणि मिरचीची फोडणी करावी आणि हि फोडणी कोशिंबिरीत एकत्र करावी. 

खास टिप्स : 

* फोडणीत मिरची टाकताना, गॅस बंद करतांना टाकावी म्हणजे तिखट एकदम डोळ्यात जात नाही किंवा ठसका लागत नाही. 

* हि कोशिंबीर कोणत्याही सणावाराच्या जेवणात किंवा उपवासाच्या दिवशी साबुदाण्याच्या खिचडी बरोबर चांगली लागते.