साबुदाणा वडा
साहित्य:
२ वाट्या साबुदाणा, दिड वाटी बटाटे कुस्करून, ३- ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, थोडेसे ओले खोबरे, मीठ, ४- ५ चमचे जिरे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, थोडंसं दूध आणि कोथिंबीर
कृती :
साबुदाणा भिजवून घ्या आणि नंतर पाणी निथळून घ्या. साबुदाणा चांगला मऊ आणि सुटसुटीत भिजला पाहिजे. त्यात थोडे तेल, मीठ, जिरे, मिरच्या, दाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून चांगले मिक्स करून मळून घ्या.
या पिठाचे लहान लहान चपटे गोळे करा आणि तेलात तळुन घ्या.
गरम गरम साबुदाणा वडे गोड दह्यासोबत सर्व्ह करा.