चॉकलेट केक | Chocolate cake recipe in marathi

चॉकलेट केक

साहित्य :

मैदा २ कप, कोको पावडर १ कप, साखर दीड कप, अंडी ४, दूध अर्धा कप, लोणी १ कप, बेकिंग पावडर २ चमचे, व्हॅनीला इसेन्स १ चमचा

कृती :

chocolate cake recipe

मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर एका भांड्यात चाळून घ्या. तिन्ही पदार्थ एकत्र करा.

साखर मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यामध्ये लोणी टाका. मिश्रण फेटून घ्या. साखर पूर्ण विरघळून लोणी आणि साखर एकजीव झाले पाहिजे.

आता एका छोट्या भांड्यात अंडी फेटून घ्या. फेटलेली अंडी आणि साखर – लोणी मिश्रण एकत्र करा. छानपैकी फेटून घ्या. सर्व मिश्रण एकजीव असले पाहिजे.

मैदा,कोको पावडर आणि बेकिंग पावडर मध्ये हे एकजीव केलेलं मिश्रण टाका. सगळे मिश्रण एकाच दिशेने फिरवत फेटून घ्या. आता सर्व मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये दूध टाका. पुन्हा एकदा फेटून घ्या. आता मिश्रणात व्हॅनीला इसेन्स मिसळा.

बेकिंग भांड्याला लोण्याचा हात लावून घ्या आणि थोडासा मैदा टाका. मैदा भांड्याला चिकटला पाहिजे. मैदा जास्त होता कामा नये.

एकजीव केलेले केकचे मिश्रण भांड्यात ओता. हाताने किंवा वाटीच्या उथळ भागाने पसरून सपाट करून घ्या.

ओव्हन १८० वर प्रीहीट करून घ्या. त्यामध्ये २५ – ३० मिनिटे केक बेक करा. केक भांड्याच्या कडा सोडू लागला याचा अर्थ केक पूर्ण बेक झाला. एखादी पिन किंवा टोकदार पदार्थ केक मध्ये रोवून काढा. त्या पिनला जर केक चिकटला नाही तर केक तयार झाला असे समजावे.

१०. आता केक गार झाल्यावर छान पिसेसमध्ये कापून सर्व्ह करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर केकवर लिक्विड चॉकोलेट सॉस देखील तुम्ही टाकू शकतात याने केकची चव आणखी चांगली होईल.