इडली
साहित्य :
तीन भांडे तांदूळ ( उकड तांदूळ घेल्यास इडली जास्त हलकी होते), एक सपाट भांडे उडीद डाळ, एक मोठा चमचा मीठ, दोन चमचे तेल.
कृती :
recipe for soft idali
इडली करण्याआधी आदल्या दिवशी सकाळी डाळ आणि तांदूळ वेगवेगळे स्वच्छ धुवून भिजत घालावे. संध्याकाळी वेगवेगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. मग एका मोठ्या भांड्यात मिक्स करावे. त्यावर झाकण ठेवून ते भांडे उबदार ठिकाणी ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी इडली करताना त्यात तेल आणि मीठ घालून ते पीठ थोडे हलवून घ्यावे.
इडली स्टँडला तेलाचा हात लावून त्यात इडलीचे रवण टाकावे. साधारण दहा मिनिटे उकडावे.
झाल्यावर गॅस बंद करून इडल्या तश्याच वाफेवर दोन मिनिट ठेवाव्या.
नंतर बाहेर काढल्यावर किंचित वाफ गेल्यावर चमच्याला तेलाचा हात लावून त्या चमच्याने इडल्या पात्रातून काढाव्या.
नारळाची किंवा दाण्याची ओली चटणी आणि सांबाराबरोबर इडल्या सर्व्ह कराव्या.