खमंग ढोकळा असा बनवा | Dhokala recipe in marathi

ढोकळा 

साहित्य : 

डाळीचे पीठ दोन वाट्या, एक ते अर्धा वाटी आंबट ताक, चार मिरच्या, अर्धा इंच आले, मीठ, साखर 

dhokla kasa banvava dhokla recipe in marathi
dhokla recipe in marathi image source pixabay

कृती : 

how to make dhokala at home recipe in marathi

ढोकळ्या करण्याआधी सुमारे चार ते पाच तास पीठ साधारण आंबट ताक असेल तर एक वाटी घेऊन त्यात भिजवावे. लागले तर त्यात पाणी घालावे. नंतर मिरची आले वाटून घालावे. 

मीठ, साखर अंदाजाने घालावे. आणि पाव चमचा हळद घालून मिक्स करावे. चिंचोक्याएवढा खायचा सोडा किंवा इनो चमचाभर तेलात एकजीव करून पिठात मिक्स करावे. भज्यांच्या पिठाइतपत सैल पीठ करावे.

साध्या कुकरमध्ये अगर पातेल्यात पाणी घालून ते उकळू द्यावे. त्यात तयार केलेला पिठाचा पसरट डब्बा किंवा ताटली एक स्टॅन्ड ठेवून त्यावर  ठेवावी. वर झाकण ठेवावे. साधारण दहा मिनिटे गॅस मोठा ठेवावा. नंतर पाच मिनिटे गॅस मध्यम ठेवून ढोकळा शिजू द्यावा. 

गार झाल्यावर एक डाव तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेले मिरचीचे तुकडे, किंचित हिंग घालावे.ती फोडणी गरमच ढोकळ्यावर टाकावी.  ढोकळ्याचे सुरीने चौकोनी काप करावे. 

खायला देतांना ढोकळ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून द्यावी.