मुगाचे धिरडी | Mugache dhirde recipe

मुगाचे धिरडी

अतिशय पौष्टिक आणि न्याहारीसाठी अतिउत्तम  अशी मुगाची धिरडी 

साहित्य:

२ वाटया हिरव्या मुगाची डाळ, १/२ वाटी उडीद डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, ६-७ लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मीठ चवीनुसार

कृती:

हिरव्या मुगाची डाळ व उडदाची डाळ आदल्या रात्री भिजत घालावी. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उपसून दोन्ही डाळी, मिरच्या, लसूण पाकळ्या व कोथिंबीर घालून मिश्रण वाटून घ्यावे.

पिठात थोडेसे पाणी घालून पीठ पातळसर धिरड्याच्या पिठाप्रमाणे तयार करावे.

मीठ घालून ढवळून घ्यावे.
नॉन स्टिक तव्यावर थोडेसे तेल पसरावे. तवा गरम झाला की तयार मिश्रण थोडेसे घालावे. चमच्याने पसरून घ्यावे.

गॅस थोडासा मंद करून झाकण ठेवावे.
एका बाजूला झाले की लगेचच पलटून दुसऱ्या बाजूने करून घ्यावे.

गरम गरम धिरडी दही किंवा चटणी सोबत एन्जॉय करावीत. 

mugache dose kase karave, mugachi dhirdi, moong dal dosa, easy breakfast