लसूण चटणी
साहित्य :
अर्धी वाटी सोललेला लसूण, एक वाटी किसलेले सुके खोबरे, पाव वाटी भाजलेले दाणे, दिड चमचा तिखट किंवा ७- ८ सुक्या लाल मिरच्या, चिंचेचे मोठे बुटुक, चवीपुरता गुळ, पाव चमचा जिरे, दिड चमचा मीठ.
कृती :
सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे. लाल मिरच्या वापरणार असल्यास चमचाभर तेलात त्या परतून घ्याव्या. नंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर अगर खलबत्त्यात चटणी कुटून घ्यावी.
हे करतांना पाण्याचा हात अजिबात लागू देऊ नये. सर्व साहित्य आणि वापरायचे भांडे कोरडे असावे. यामुळे चटणी जास्त दिवस टिकते.
खास टिप्स :
* खोबरे नसल्यास तुम्ही आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्यांचा हि वापर करू शकतात.
* वाढताना या चटणीवर कच्चे तेल टाकावे किंवा आवडीनुसार दही टाकावे. यामुळे चटणी आणखी खमंग लागते.