शेवयांची खीर
साहित्य :
कुस्करलेल्या शेवया पाऊण वाटी, चार वाट्या दूध, साखर पाऊण वाटी, ५-६ वेलदोडे किंवा वेलची पूड, किंचित जायफळ उगाळून किंवा किसून (ऐच्छिक) , काजूचे तुकडे, बेदाणे आवडीनुसार, अर्धा चमचा तूप, किंचित केसर
कृती :
शेवया तुपावर मंद आचेवर गुलाबी रंग होईस्तोवर भाजून घ्याव्या. एकीकडे वाटीभर पाणी गरम करण्यास ठेवावे.
शेवया परतून झाल्यावर त्यावर ते गरम पाणी टाकून दोन ते तीन मिनिट झाकून ठेवावे. थोड्या वेळाने पातेले तिरके करून त्यातील शेवयांवरील पाणी काढून टाकावे.
आता त्यात दूध घालून चांगली उकळी येऊ द्यावी. त्यात साखर घालून मधून मधून ढवळत राहावे.
शेवया शिजल्यावर भांडे गॅस वरून खाली उतरवून ठेवावे. खीर गरम असतांनाच त्यात काजूचे तुकडे, चारोळ्या, केसर इत्यादी आवडीनुसार टाकावे.
वेलची पूड आणि जायफळ पूड वरून भुरकावी. एकदा छान मिक्स करून गरम गरम खाण्यास घ्यावी.
खास टिप्स :
* आजकाल बाजारात खास खिरीसाठी तुपावर परतलेल्या शेवया सुद्धा मिळतात. त्या वापरणार असल्यास त्यात डायरेक्ट दूध मिक्स करून झटपट खीर बनवता येईल.
* शेवयांची खीर गार झाल्यानंतर घट्ट होते. त्यासाठी तुमच्या आवडीनुसार दुधाचे प्रमाण खीर करताना वाढवू शकतात. नंतर खीर खाताना दूध घालायचे असल्यास किंचित कोमट करून दूध वापरावे.
shevyachi kheer, shevyachi kheer recipe in marathi, vermicelli kheer, marathi recipes, kheer recipe in marathi,