गाजर हलवा
साहित्य :
एक किलो गाजरे, २०० ग्राम खवा, दोन वाट्या दूध, २-३ वाट्या साखर, ७-८ वेलदोडे किंवा वेलची पूड, आवडीनुसार काजू बदामाचे तुकडे किंवा चारोळी
कृती :
गाजरे चांगली धुवून त्याची वरची साले काढून घ्यावी. गाजरे किसणीने चांगली किसून घ्यावी. किसतांना आतला पांढरा भाग किसू नये.
एक जाड बुडाची कढई घेऊन मंद आचेवर गॅस वर ठेवावी. यात तूप टाकून गाजराचा किस मंद आचेवर तुपावर चांगला परतून घ्यावा.
त्यानंतर त्यात साखर घालून चांगला शिजू द्यावा.
खवा हाताने थोडा मोकळा करून घ्यावा. दूध आणि हा खवा गाजराच्या किसात घालून चांगले मिक्स करून शिजू द्यावे.
मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलदोडयाची पूड, आवडीनुसार काजू बदामाचे तुकडे, चारोळी वगैरे टाकावे. दूध आटले आणि गाजरे शिजले कि हलवा तयार.
हलवा गरम किंवा गार कसाही चांगला लागतो.
खास टिप्स :
* गाजर हलवा करतांना घरात खवा नसल्यास, सायीसह दूध हलवा बनवतांना वापरावे. शिजताना त्या सायीचे खव्यासारखे कण तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात.
* आदल्या दिवशीचे पेढे उरले असतील तर त्यांचा हि उपयोग गाजर हलवा बनवतांना करता येतो. यामुळे खव्याची चव येते. पेढ्यात वेलची पुड असल्यास हलव्यात वेलची पुड घालू नये.
gajar halwa, gajar halwa recipe, gajar halwa with khoya, gajar halwa marathi recipe,