कांदा भजी (प्रकार १)
मस्त पावसाळी हवा आणि त्यात गरम चहासोबत गरम गरम कांदा भजी असतील तर ते सुख काय वर्णावे ?
” बोली मराठी” वर आम्ही कांदा भजीची रेसिपी आणली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कांदा भजी एकदा नक्की करून बघा. पुन्हा पुन्हा कराल.
साहित्य :
एक वाटी बारीक चिरलेला कांदा, दोन वाट्या डाळीचे पीठ, एक मोठा चमचा तिखट, एक चमचा मीठ, एक चमचा ओवा, दोन मोठे चमचे कडकडीत तेलाचे मोहन, चमचाभर कोथिंबीर,
आवडत असल्यास कच्चा मसाला एक चमचा, दोन मोठे चमचे तांदळाचे पीठ (नसले तरी चालेल) , तळण्यासाठी तेल
कृती :
चिरलेला कांदा, डाळीचे पीठ (बेसन) , तिखट, मीठ, ओवा हे सर्व तेलाचे मोहन घालून लागेल तसे पाणी घालून सैलसर भिजवावे. फार पातळ हि करू नये आणि फार घट्ट हि ठेवू नये.
तेल कडकडीत तापल्यावर त्यात हाताने किंवा चमच्याने भजी सोडावी आणि चांगली खरपुस तळून घ्यावी.
kanda bhaji, marathi recipes, monsoon recipes, kanda bhaji recipe in marathi