राजगिऱ्याच्या लाह्या करणे 

राजगिऱ्याच्या लाह्या करणे 

उपवासाच्या दिवसात राजगिरा लाहीचा उपयोग आपण अनेक प्रकारे करत असतो. या लाह्या शक्यतो आपण बाहेरून विकत आणतो पण ह्या लाह्या घरी बनवणे सुद्धा अगदी सोपे आहे. 

साहित्य : 

पाव किलो राजगिरा 

कृती : 

एक मोठी जाड बुडाची कढई तापत ठेवावी. त्यात दोन दोन चमचे राजगिरा टाकावा. हातात स्वच्छ फडक्याचा मोठा बोळा घ्यावा. आणि त्याने राजगिरा हलवावा. 

गॅस एकदम मोठा ठेवू नये. कढई एकदा चांगली तापली कि मंद ते मध्यम आचेवरच गॅस ठेवावा. 

हळू हळू राजगिरा फुटून त्याच्या लाह्या तयार होतात. 

गार झाल्यावर ह्या लाह्या हवाबंद डब्ब्यात भरून ठेवाव्या. 


राजगिरा लाही म्हणजे काय?

राजगिऱ्याच्या धान्यापासून या लाह्या बनवल्या जातात. यात अनेक पोषणमूल्यं असतात. या लाह्या सहजपणे बाजारात मिळतात शिवाय या घरी सुद्धा बनवणे अगदी सोपे असते. 

राजगिऱ्याला इंग्रजीत काय म्हणतात? 

राजगिऱ्याला इंग्रजीत अमरॅन्थ म्हणतात.  

राजगिऱ्याच्या लाह्या खाण्याचे फायदे काय?

राजगिऱ्याच्या लाह्या पचायला हलक्या असतात शिवाय यात अनेक पोषणमूल्यं असतात, ज्यामुळे हाडे बळकट व्हायला मदत होते, वजन नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. 
यात फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्टतेच्या समस्यातून आराम मिळतो. 

राजगिऱ्याच्या लाह्या कश्या खाव्या? 

राजगिऱ्याच्या लाह्या नुसत्या हि खाता येतात शिवाय त्यापासून अनेक गोड तिखट पदार्थ हि बनवता येतात जसे लाडू, चिक्की, चिवडा. 
शिवाय या लाह्यांचे पीठ करून तुम्ही त्याचा वापर धिरडे, थालीपीठ यातही करू शकतात.

Scroll to Top