आली माझ्या घरी ही दिवाळी
अष्टविनायक चित्रपटातील हे गाणे नाही ऐकले तर दिवाळीची सुरुवात झाल्यासारखे वाटत नाहीच. या गाण्यातच काही खास जादू आहे. याचे शब्द, याचे संगीत आणि स्वर अगदी आपल्याला दिवाळीच्या वातावरणाचा भास देतात.
चित्रपट: अष्टविनायक
गीतकार: मधुसूदन कालेलकर
संगीतकार: अनिल – अरुण
स्वर: अनुराधा पौडवाल
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली
मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे
जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संग होता हरी जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी
आली माझ्या घरी ही दिवाळी
आली माझ्या घरी ही दिवाळी, aali majhya ghari hi diwali, lyrics, lyrics in marathi, ashtavinayak songs lyrics in marathi, marathi songs lyrics, diwali songs in marathi,