बदामाची खीर 

बदामाची खीर 

उपवासाच्या दिवशी काही तरी गोड खायची इच्छा होत असेल पण नेहमीचे साबुदाणा खीर, गुळ शेंगदाणा लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर हि सोपी बदामाची खीर नक्की करून बघा. 

साहित्य : 

पाव वाटी बदाम, चार कप दूध, साखर आणि वेलदोडा पूड 

कृती : 

बदाम कोमट पाण्यात तासभर भिजत घालावे. बदामाची साले काढून घ्यावी. 

थोडे से दुध घालून हे बदाम चांगले बारीकसर वाटून घ्यावे. 

दूध उकळत ठेवावे. उकळी आल्यावर त्यात बदामाचा वाटलेला गर, साखर आणि वेलदोडा पूड घालून हलवून घ्यावे. एक दोन चांगल्या उकळ्या येऊ द्याव्या. 

हि खीर गरम गरम खाण्यास द्यावी. 

Scroll to Top