चॉकोलेट मोदक
साहित्य:
ड्रिंकिंग चॉकोलेट पाव वाटी, कोको पावडर तीन ते चार चमचे, रवा भाजून पाव वाटी, डेसिकेट कोकोनट चार ते पाच चमचे, साखर पाव वाटी, चॉकोलेट चिप्स सजावटीसाठी
कृती :
साखरेचा पाक करून घ्या. एका कढईमध्ये भाजलेला रवा, साखरेचा पाक, चॉकलेट पावडर, कोको पावडर, डेसिकेट कोकोनट सर्व मिक्स करून घ्या.
त्याचा घट्ट गोळा करावा.
या मिश्रणाचे मोदकाच्या साच्यात घालून छोटे छोटे मोदक करावे आणि वरून चॉकोलेट चिप्स टाकून गार्निश करावे आणि बाप्पासमोर ठेवावे.