छोल्यांची उसळ
छोल्यांची उसळ, chole recipe, chana masala, chole bhature, how to make chole masala easy, chole kase shijvave
साहित्य :
दिड पाव छोले, दोन चमचा जिरे, सात ते आठ काळी मिरी, दालचिनी पूड एक मोठा चमचा, पाव वाटी धने पूड, तिखट, दोन तमालपत्र, बडीशोप एक चमचा, एक आल्याचा तुकडा, आठ दहा लसूण पाकळ्या, दोन मोठे कांदे, एक मोठा टोमॅटो, दोन मध्यम आकाराचे बटाटे, कढीपत्ता, मीठ, तेल आणि इतर फोडणीचे साहित्य
कृती :
chole recipe in marathi
छोले आदल्या दिवशी भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये चांगले शिजवून घ्यावे. छोले आतापर्यंत मऊ शिजले पाहिजे पण त्यांचा अगदी गाळ व्हायला नको.
तेलाची फोडणी करून त्यात जिरे, आले, लसूण, बडीशोप, छोले मसाला टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर बारीक कापलेला कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ होईस्तोवर शिजवून घ्यावे. या उसळीला तेल नेहमीपेक्षा किंचित जास्त घालावे.
नंतर त्यात शिजवलेले छोले टाकावे. पाणी टाकू नये. आधी हे छोले मसाल्यात मंद आचेवर चांगले परतून घ्यावे.
चवीनुसार मीठ आणि तिखट टाकावे. वरून गरजेनुसार गरम पाणी टाकावे. उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी करून त्यात टाकाव्या. आणि दोन ते तीन चांगल्या वाफा येऊ द्यावा.
याला फार रस्सा नसतो. थोडा अंगाबेतचा रस्सा ठेवावा.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरकावी.
या उसळी बरोबर भटुरे चांगले लागतात.