क्रिम ऑफ पोटॅटो सूप
बटाट्याचे अनेक पदार्थ आपण खात असतो. बटाटा भाजी, भजी शिवाय अनेक भाज्यांमध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन करून बटाटा वापरला जातो.
पण तुम्ही अश्या प्रकारे बनवलेले क्रिम ऑफ पोटॅटो सूप खाल्ले आहे का कधी?
बनवायला सोपे आणि एकदम यम्मी!
हि रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा.

साहित्य :
८ बटाटे सालासहीत बारीक चिरून, पाव वाटी मैदा, २ वाट्या व्हेज स्टॉक, १ वाटी ताजे क्रिम, २ चमचे हिरवी मिरची बारीक चिरून, अर्धा चमचा मिरपूड, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर
कृती :
५- ६ चमचे बटर आणि एक चमचा तेल एकत्र तापवावे. त्यात बटाटे लालसर परतावे. झाकण ठेवून एक वाफ आणावी.
या बटाट्यातच मैदा घालावा आणि चांगले परतून घ्यावे. गॅस बंद करून हे मिश्रण थंड करावे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
पुन्हा हे मिश्रण गरम करण्यास ठेवावे आणि यात व्हेज स्टॉक आणि क्रिम घालावे. एक चांगली उकळी येऊ द्यावी.
उकळी आल्यावर गॅस बारीक करावा आणि त्यात मीठ आणि मिरचीचे तुकडे घालावे. थोडेसे ढवळून गरमा गरम सूप सर्व्ह करावे.
सजावटीसाठी वरून थोडी कोथिंबीर आणि क्रिम घालावे.
क्रिम ऑफ पोटॅटो सूप, potato soup, cream of potato soup, boli marathi,