देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी | Dekh tuni bayko kashi lyrics

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी lyrics in marathi

खान्देशी गाण्यांचा एक वेगळाच ठसका असतो. त्यासोबत असलेल्या खास खान्देशी म्युजिकमुळे हि गाणी पाय थिरकायला लावतात. 

असेच एक अहिराणी भाषेतील गाणे ‘ देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी ‘, ह्यावर अनेक जणांनी रिल्स बनवल्या त्यामुळे हे गाणे घराघरात पोहोचले. 

गीतकार : अंजना बार्लेकर 

संगीत : दिनेश बाशिंगे आणि जगदीश संधानशिव 

गायक : अंजना बार्लेकर आणि  जगदीश संधानशिव 

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

इले सासराना नई धाक
इले सासू ना नई धाक
नुसती करस हाई रुबाब
आणी शायनिंग मा ऱ्हास

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

ती सांगस हाई निस्ती झलक शे
ती सांगस हाई निस्ती झलक शे

मना लटका झटका ते भाऊ अलग शे
मना लटका झटका ते भाऊ अलग शे

बरी चांगली नई दिसस
निस्ता पावडर चोपडस
आरसा मा जे देखी ऱ्हास
देखी देखी खुश व्हस

माय काय उपाधी करी लिनी मिनी
अशी वहू आनी
भलती शे देडशानी

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

इना डोकावर एवढा काय डोंगर शे
इना डोकावर एवढा काय डोंगर शे

सोताला समजस कीतली सुंदर शे
सोताला समजस कीतली सुंदर शे

एवढा मेकअप अन इथला शिंगार
तरी लागस तू कितली बेकार

एवढा मेकअप अन इथला शिंगार
तरी लागस तू कितली बेकार

इनी चम चम साडी
इना सॅंडल बी भारी
हाई जास यासनावर पडी

माय अशी तोंड खुपसाई पडनी
इनी सॅंडल तुटनी
व्हयनी हाई खिसावनी

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

निस्ता डीजे वॉल ले हाई, गाना सांगस
निस्ता डीजे वॉल ले हाई, गाना सांगस

एक सरना नई सरना दुसरा लावलं लावस
एक सरना नई सरना दुसरा लावलं लावस

हाई हुदंग सारखी
निस्ती कुदया मारस
अणि कॅटरिना कैफ सोताले म्हणस

माय अशी बाय शे हाई बिन लाजनी
इले वहु म्हणानी
शरम लागणी

देख तुनी बायको कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदी ऱ्हायनी
कशी डोली ऱ्हायनी

माय काय काय सांगू आते तुले
कथाई पडी गई हाई मना पिल्ले

निस्ती किट किट करस मना मागे
शांती लागू नई देत मना जीवाले

घर ना भांडा घासाले लावस माले
नई घासत त गैरी मार मारस माले

सकाय उठस हाई १०-१२ वाजाले
भुक्या भुक्या शी वाटे लावस कामले

ओनलाईन ऑर्डर करस
पिझ्झा बर्गर मांगाडस
एकली एकली जे हानस
मार मले खवाडस

अशी कशी बायको करी लिनी मिनी
मले जीवु नई देत
अनी मरू बी नई देत

कशी नाची ऱ्हायनी
कशी कुदि ऱ्हायनी

Scroll to Top