डिंक लाडू | Gond Laddu Recipe

डिंक लाडू 

साहित्य : 

एक वाटी डिंकाचे बारीक खडे, दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस भाजून, अर्धी वाटी भाजलेली खसखस, दोन वाट्या खारीक पूड तुपावर थोडी भाजून, दहा ते बारा बदाम काप करून, वीस पंचवीस गोडांबी भाजून, दोन ते तीन वाट्या बारीक चिरलेला गुळ, एक वाटी तुपावर भाजलेली कणिक किंवा वरईचे पीठ , लागेल तसे साजूक तूप 

कृती : 

कढईत तूप तापवून त्यात डिंक फुलवून घ्या (तळून घ्या). खारीक पूड भाजून घ्या. कणिक तुपात खमंग भाजा. हे मिश्रण गरम असतांनाच त्यावर मऊ केलेला गुळ टाका. 

त्यात खसखस, खोबरं, बदाम, गोडंबी घाला आणि हाताने नीट मिक्स करा. तूप कमी वाटल्यास वरून गरम करून थोडं थोडं घालत राहा आणि नीट मिक्स करून या मिश्रणाचे लाडू वळा. 

हे लाडू थंडीच्या मौसमासाठी खूप पौष्टिक समजले जातात. 

खास टिप्स : 

उपवासासाठी डिंक लाडू करायचे असतील तर कणकेऐवजी वरईचे पीठ भाजून वापरावे. 

dinkache laadu recipe, gond laddu, gond ladoo, dinkache laadu recipe in marathi, dink, gond, dink ladoo, dink ladoo recipe in marathi, dink ladoo benefits, dink ladoo recipe marathi, dink ladoo, laddu how to make gond, ladoo marathi recipe, maharashtrian dinkache ladoo recipe,