गाजराची कोशिंबीर
साहित्य :
गाजराचा किस एक वाटी, दोन छोटे चमचे साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, तिखटपणा हवा असल्यास एक हिरवी मिरची बारीक चिरून
कृती :
गाजराच्या किसात सर्व साहित्य आणि दाण्याचे कूट घालावे. त्यात लिंबू पिळावे आणि चांगले मिक्स करावे.
तेलाची मोहरी हिंगाची फोडणी करावी, फोडणीत मिरचीचे तुकडे टाकावे. आणि हि फोडणी गाजराच्या किसावर वरून टाकून चांगली मिक्स करावी.
खास टिप्स :
* या कोशिंबिरीत मिरचीऐवजी तिखट हि वापरता येते. तिखट फोडणीत न टाकता डायरेक्ट गाजराच्या किसात मिक्स करावे.
* या कोशिंबिरीत तिखट घातल्यास किंचित साखर घालावी. तिखट गोड चांगली चव येते.