कणकेचे गोड थालीपीठ 

कणकेचे गोड थालीपीठ 

साहित्य : 

दोन वाट्या जाड कणिक, गुळ, मीठ आणि तूप 

कृती : 

गुळ बारीक चिरून घ्यावा किंवा गुळ पावडर घेऊन त्यात चवीपुरते मीठ घालावे. मोहन म्हणून थोडे तूप घालावे. त्यात कणिक मिसळून नेहमीसारखे पीठ भिजवावे. 

मध्यम गॅस वर तवा चांगला तापवून थोडे थोडे तूप सोडून हे थालीपीठ लावावे. दोन्ही बाजूने खरपूस शेकावे. आणि गरम गरम खाण्यास द्यावे. 

खास टिप्स : 

* या मध्ये लाल भोपळ्याचा किस हि घालता येईल. त्याने या थालीपीठाची चव आणखी छान होते.