केएफसी स्टाइल फ्राइड चिकन रेसिपी | KFC Style fried chicken

  आपल्यापैकी बरेच जण असतील ज्यांना KFC चे चिकन (kfc chicken) खूप आवडते. पण आता यासाठी केएफसीमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. आज आम्ही तुम्हाला KFC सारखे चिकन घरी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चिकन आणि काही मसाल्यांनी घरी बनवून तुम्ही या स्वादिष्ट स्नॅकचा आनंद घेऊ शकता.   

केएफसी स्टाईल फ्राईड चिकन KFC Fried Chicken recipe in marathi

केएफसी स्टाईल फ्राईड चिकनसाठी साहित्य:

८ चिकन ड्रमस्टिक, १०० ग्रॅम दही/ताक, १ फेटलेले अंडे , ५० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम ब्रेडचा चुरा/ ब्रेडक्रम्स , १ टीस्पून मिरची पावडर, १ टीस्पून पांढरी मिरी पावडर १ टीस्पून बेसिल लिव्हज, १ टीस्पून ओरेगॅनो, १ हिरवी मिरची,१ टीस्पून लसूण पावडर, (पावडर नसेल तर लसूण ठेचून किंवा किसून घातला तरी चालतो) ,१ टीस्पून आले, मीठ चवीनुसार आणि तळण्यासाठी तेल

केएफसी स्टाइल फ्राइड चिकन बनवायची कृती :

चिकन नीट धुवून घ्या. चिकनमधून पाणी व्यवस्थित काढून टाकावे.
आता चिकनमध्ये फेटलेले अंडे, दही/ताक, अर्धा टीस्पून तिखट, मीठ घालून मिक्स करा.

तीन ते चार तास मॅरीनेट करण्यासाठी झाकून ठेवा.

आता त्यात मैदा, हिरव्या मिरच्या, पांढरी मिरी पावडर, ओरेगॅनो, आले, लसूण, बेसिल लिव्हज आणि उरलेले मसाले आणि मीठ घाला.
पिठाचे मिश्रण चिकनवर ओतून चांगले झाकून ठेवा आणि नंतर ब्रेड क्रम्ब्स घाला.

जाड बुडाच्या पॅनमध्ये किंवा कढईमधे तेल गरम करून चिकन मंद आचेवर चांगले आतपर्यंत तळून घ्या. 
टोमॅटो केचपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

kfc original recipe,kfc crispy fried chicken recipe, kfc chicken recipe in marathi, kfc style fried chicken recipe in marathi, kfc in marathi, recipe for kfc chicken coating, kfc chicken recipe ingredients, kfc chicken recipe in marathi, boli marathi, bolimarathi.com