लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
जुन्या मराठी चित्रपटातील अनेक गाणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. लख लख चंदेरी तेजाची हे गाणे सुद्धा यापैकी एक. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातील असून सुद्धा, ती लख लख, ते तेज या शब्द, संगीत आणि स्वरांद्वारे आपल्यापर्यंत नेहमी पोहोचते.
चित्रपट: शेजारी
गीतकार: शांताराम आठवले
संगीत: मास्टर कृष्णराव
गायक: जयश्री, वसंत देसाई
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !
चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !
झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हा हा !
आनंदून रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हा हा !
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, lakh lakh chanderi tejachi, lyrics, lyrics in marathi, marathi songs lyrics, boli marathi, shejari, शेजारी