लसूण जवस चटणी
साहित्य :
पाव वाटी लसूण, एक वाटी जवस, अर्धी वाटी सुके खोबरे, दिड चमचा तिखट, एक चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे
कृती :
जवस आणि सुके खोबरे कढईमधे मंद आचेवर वेगवेगळे परतून घ्यावे. नंतर साहित्यातील सर्व जिन्नस एकत्र करून कुटून घ्यावे किंवा मिक्सरवर बारीक करावे. एका कोरड्या हवाबंद डब्ब्यात हि चटणी भरून ठेवावी.
खास टिप्स :
* जवस भाजण्याआधी थोडे निवडून घ्यावे, बाजारातून आणले असतील तर त्यात काही खडे वगैरे असू शकतात.
* या चटणीवर आयत्या वेळेस दही किंवा तेल घेऊन खावे. चव खूप चांगली लागते.
* चटणी वाटणांना जवस मिक्सर मध्ये वेगळे भरड वाटून चटणी मध्ये मिक्स केल्यास हि चटणी जास्त दिवस टिकते. कारण शेंगदाण्याप्रमाणे जवसाला हि मिक्सर मध्ये जास्त वाटल्यास तेल सुटते. यामुळे चटणी जास्त दिवस टिकत नाही. वास येतो. तो वास टाळण्यासाठी जवस वेगळे वाटावे किंवा कुटावे.