लिंबू सरबत 

लिंबू सरबत 

साहित्य : 

अर्धी वाटी लिंबू रस, दिड ते २ वाट्या साखर, मीठ 

कृती : 

लिंबू रसात साखर टाकून विरघळून घ्यावी. आता चवीनुसार मीठ घालून वरून गार पाणी घालावे आणि चांगले ढवळून घ्यावे. 

ग्लासच्या कडेला लिंबाची कापलेली पातळ चकती लावून हे सरबत गार सर्व्ह करावे. 

खास टिप्स : 

* या मध्ये थोडा आल्याचा रस घातल्यास चव आणखी छान येते. 

* लिंबू सरबतात थोडे वेगळेपण हवे असल्यास यात रोज सिरप, वेलचीपूड, केसर, वाळा इसेन्स या पैकी काहीही आवडीनुसार टाकावे. 

Scroll to Top