आंबा वडी (Mango Barfi)
साहित्य :
२ वाट्या शक्यतो हापूस आंबा रस (नसल्यास इतर हि छान पिकलेल्या आंब्याचा रस चालेल), ३ वाट्या साखर, ३ ते ४ टेबलस्पून पिठीसाखर
कृती :
आमरस आणि साखर मिक्सरमधून काढावे. जाड बुडाच्या कढईमधे काढून मंद आचेवर ठेवावे. सारखे ढवळत राहावे आणि आटवून घ्यावे.
बाजूने कडा सुकून साखर दिसू लागली कि गॅसवरून खाली उठरवून घ्यावे आणि गार करावे. गार करत असताना घोटत राहावे आणि पिठीसाखर घालावी.
हे मिश्रण गार हि होईल आणि त्यात पिठीसाखर चांगली मिक्स हि होईल.
एका ताटाला थोडे तूप लावून त्यात हे मिश्रण एकसारखे पसरवावे. आणि घट्ट झाल्यावर वड्या कापाव्या.
मिश्रण घट्ट न वाटल्यास पुन्हा किंचित आटवून घ्यावे. किंवा काही वेळ फ्रिज मध्ये ठेवावे म्हणजे मिश्रण चांगले घट्ट होऊन वड्या चांगल्या कापता येतील.
आंबा वडी, आंबा वडी कशी बनवावी, आंब्याचे पदार्थ, उन्हाळी पदार्थ, गोड पदार्थ, मराठी रेसिपी, आंबा रेसिपी, marathi recipes, mango barfi recipe in marathi, marathi dessert recipes, mango recipes, quick mango recipes, aamba vadi, mango barfi, how to make mango barfi at home easy recipe