गणेश उत्सव स्पेशल दहा दिवसांचा जेवणाचा मेनू 

गणेश उत्सव स्पेशल दहा दिवसांचा जेवणाचा मेनू 

गणपती बाप्पाचे  आपल्या घरी आगमन होणे हि घरादारासाठी अगदी आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट असते. घरातली गृहिणी तर एवढी बिझी होऊन जाते कि विचारता सोय नाही. 

मग ती पूर्ण वेळ गृहिणी असो किंवा नौकरी आणि घर दोन्ही धुरा सांभाळणारी स्त्री, अश्या सणाच्या वेळेस चार वेगळे पदार्थ निगुतीने करणे तिला हि आवडते. 

घरातले सगळे जण हि ‘आज खाण्यात काय स्पेशल’ हे विचारतच असतात. 

अश्या वेळेस उत्साह असला तरी ‘रोज काय नवीन करावे’ हा गहन प्रश्न काही सुटत नाही आणि याने खूप टेन्शन वाढते. 

अश्या सणांच्या वेळेस घरातली स्त्री मुख्य टेन्शन फ्री आणि आनंदी हवी. यासाठी आम्ही दहा दिवसांचा जेवणाचा पूर्ण प्लॅन घेऊन आलो आहोत. (Maharashtrian meal menu in marathi)

ganapati 10 days full meal menu in marathi maharashtrian food boli marathi
ganapati 10 days full meal menu in marathi maharashtrian food boli marathi

यात नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण याच्या सोप्या, पौष्टिक पण चविष्ट पाककृतींची नावे दिली आहेत. याच्या रेसिपिज आपल्याला माहित असतातच पण आम्ही हि त्या इथे लवकरच देऊ. 

या दहा दिवसांच्या मिल प्लॅनने रोज खाण्यासाठी काय करावे या प्रश्नाशी लढा द्यावा लागणार नाही. आणि सामग्री काय काय लागते हे आधीच कळल्याने ते प्लांनिंग करणे हि अगदी सोपे होईल. 

दिवस नाश्तादुपारचे जेवण रात्रीचे जेवण
दिवस १ गणेश चतुर्थीमोदक, मसाला चहाभरलेली वांगी, भाकरी, सोलकढी, भात साबुदाण्याची खिचडी, दही
दिवस २पोहे, शिरा, चहाभरलेली भेंडी, आमटी, चपाती, भात, लोणचेमिसळ पाव, ताक
दिवस ३उपमा, कॉफी कोबी बटाटा भाजी, मसूर डाळ आमटी, भात, पोळी, पापडपाव भाजी, गुलाबजाम 
दिवस ४थालीपीठ, लोणी, चहा  वांग्याचे भरीत, भाकरी आणि कढीपनीर पुलाव आणि टोमॅटो सूप  
दिवस ५दडपे पोहे, चहा भरलेली कारली, दाल फ्राय, पोळी, भात, कोशिंबीरवडा पाव, गोड तिखट चटणी, मसाला दूध किंवा फोडणीचे ताक 
दिवस ६रवा डोसा, नारळ चटणी, कॉफी पालक पनीर, तेल लावून पराठे, मसाले भात, रायता   टोमॅटो भाजी, चपाती, दही 
दिवस ७बटाटा वडा, चहा गवार भाजी, मुगाचे वरण, चपाती, भात, कोशिंबीरओली भेळ काकडी गाजर घालून, फोडणीचे ताक
दिवस ८साबुदाणा वडे, चटणी, दही   शेवगा शेंगा रस्सा भाजी, भाकरी,ताक, भात, कोशिंबीर रगडा पॅटिस 
दिवस ९शेवई उपमा भाज्या घालून, चहा मसाला भात, कढी, कोशिंबीर, पापड इडली, सांबार, चटणी
दिवस १० अनंत चतुर्दशीमोदक, दूध  बटाटा भाजी, पुऱ्या, फोडणीचे वरण, भात, चटणीभाज्या घालून फोडणीची खिचडी, फोडणीचे ताक, कोशिंबीर

हा जेवणाचा मेनू वापरा आणि रोज रोज जेवायला काय करायचे या प्रश्नातून सुटका मिळवा आणि निवांत सण एन्जॉय करा. 

Scroll to Top