राजगिऱ्याच्या लाडू आणि वड्या
राजगिऱ्याच्या वड्या आणि लाडू लहान मोठे सगळ्यांनाच आवडते. ह्या घरी बनवणेसुद्धा अगदी सोपे आहे. चला त्याची रेसिपी बघूया.
साहित्य :
राजगिऱ्याच्या लाह्या तीन वाट्या, पाव वाटी भाजलेले दाणे, दीड वाटी बारीक चिरलेला गुळ आणि दोन चमचे तूप
कृती :
गुळात तूप घालून गुळाचा पक्का पाक करावा. गॅस बंद करून त्यात लाह्या आणि शेंगदाणे घालावे. चमच्याने हलवून चांगले मिक्स करावे.
लाडू वळायचे असल्यास हाताला तूप लावून या मिश्रणाचे , हे मिश्रण थोडे कोमटसर असतानाच लाडू वळून घ्यावे.
आणि वड्या करायच्या असल्यास हे मिश्रण तूप लावलेल्या ताटात टाकून सारखे करावे आणि लगेच वड्या कापून सेट होण्यास ठेवावे.
उपवास रेसिपी, राजगिरा लाडू, boli marathi, नवरात्री रेसिपी, राजगिरा चिक्की रेसिपी
हे सुद्धा वाचा: