शेव पुरी
साहित्य :
शेवपुरीच्या कडक पुऱ्या, बटाटे उकडून आणि कुस्करून दोन वाट्या, चार चमचे पुदिना चटणी, दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट, पाच ते सहा चमचे चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर, बारीक शेव आणि चाट मसाला.
कृती :
बटाटे चांगले कुस्करून घ्यावे. त्यात चटणी आणि चाट मसाला घालून चांगले कालवून घ्यावे. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर एकत्र करावी.
प्लेटमध्ये पुऱ्या गोलाकार किंवा आवडीनुसार मांडाव्या. त्यावर बटाट्याचे मिश्रण दाबून बसवावे. वरून थोड्या चटण्या घालाव्या. बारीक शेव, कांदा आणि चाट मसाला वरून टाकून सर्व्ह करावे.
खास टिप्स :
* हा खूप लवकर होणार पदार्थ असून लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी हि उत्तम प्रकार आहे. असे प्रकार मुले आवडीने खातात. आणि शिवाय यात बारीक किसलेले गाजर, बारीक सिमला मिरची घालून लहान मुलांच्या दृष्टीने हा पदार्थ आणखी पौष्टिक करता येईल.