या दसऱ्याला करा असे सोपे, चविष्ट श्रीखंड 

चविष्ट श्रीखंड घरीच करा 

दसरा म्हणजे आनंदाचा दिवस, या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देऊन आपण आप्तस्वकियांचे स्वागत करतो. 

अश्या आनंदच्या दिवशी श्रीखंड बऱ्याच घरी केले जाते. पण आजवर तुम्ही घरी चक्का करून श्रीखंड करून पहिले असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा. 

श्रीखंड रेसिपी 

साहित्य : 

एक किलो चक्का, एक किलो साखर, केसर काड्या ७- ८ किंवा खाण्याचा केसरी रंग, वेलदोडा पूड, जायफळ, चारोळी 

कृती :

चक्का आदल्या दिवशी पुरणयंत्र किंवा स्टीलच्या चाळणीने हाताने रगडून गाळून घ्या. गाळत असतानाच त्यात साखर घालावी. 

गाळून झाले कि त्यात वेलदोडे पूड, जायफळ, चारोळी, केसर आणि एक चिमूट मीठ घालावे. 

घरी दूध मसाला असला तर या पदार्थांऐवजी तो हि घातला तरी चालेल. 

चक्का कसा तयार करावा?

घरीच चक्का तयार करायचा असेल तर माणसांच्या अंदाजानुसार (चार माणसे असल्यास) तीन ते चार लिटर दूध साईसकट विरजावे. 

ते विरजल्यावर मोठ्या फडक्यात घालून टांगते ठेवावे. तसे ठेवतांना त्यासाठी खोलगट पातेले ठेवावे म्हणजे दह्याचे पाणी जमिनीवर सांडून डाग पडणार नाही. 

दह्यातील पाणी निघून घट्ट चक्का फडक्यात जमा होईल. तो काढून ठेवावा. फ्रिजमध्ये ठेवल्यास तो चक्का घट्टसर राहील आणि मग त्याचे श्रीखंड करावे.  

Scroll to Top