सीताफळ बासुंदी | Sitafal Basundi

सीताफळ बासुंदी

साहित्य:

१ लिटर दूध,  १ सीताफळ, ३/४ वाटी साखर, वेलची पूड, बदाम, काजू, मनुका आवडीनुसार

कृती:

जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करावे. अधून मधून ढवळत रहावे.

पातेल्यात छोटी स्टीलची बशी टाकून ठेवावी.

किंवा ढवळण्यासाठी वापरत असलेला चमचा उकळत्या दूधात ठेवावा म्हणजे दूध उतू जाणार नाही.

दूध चांगले आटू द्यावे. दूध आटून अर्धे झाले की त्यात साखर घाला.

बदाम, काजूचे काप व मनुका घालाव्या. अजून १० मिनिटे दूध उकळू द्यावे आणि वेलची पूड घालावी. १० मिनिटांनी गॅस बंद करावा. 

बासुंदी पूर्ण थंड होऊ द्यावी. 

सीताफळाच्या बिया  काढून  गर तयार करावा. हा गर थंड झालेल्या बासुंदीमध्ये घालावा. चमच्याने ढवळून घ्यावा.

नंतर ही बासुंदी फ्रीजमध्ये कमीत कमी ३-४ तास ठेवावी. थंड झाली कि सर्व्ह करावी.

sitafal basundi recipe, sitafal basundi recipe in marathi, custard apple sweet, dessert recipe, sweet dish, marathi recipes,

नक्की वाचावे असे : 

सगळ्यांच्या आवडीचे गुलाबजाम असे बनवा 

न्याहारीसाठी पौष्टिक मुगाची धिरडी अशी बनवा