स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त lyrics
भक्त देवाच्या भक्तीत लिन होतो तेव्हा त्याला सगळीकडे आपल्या देवाचे दर्शन होते, अश्याच भावना या आरतीमध्ये आहेत.
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
त्याचा लागे ना अंत (२)
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त llधृ.ll
दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात,
अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात,
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll
हो त्याचा लागे ना अंत….(२)
अल्लख म्हणुनी भिक्षा मागत आले दारात,
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll
हो त्याचा लागे ना अंत….(२)
भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत,
रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात,
कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll२ll
हो त्याचा लागे ना अंत….. (२)
श्वानांची फौज होती त्यांच्या संगत,
श्वानांना भाकर टाकत होते भगवंत,
बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll३ll
हो त्याचा लागे ना अंत (२)
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत,
खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात,
गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा, ठेवा ध्यानात ll४ll
हो त्याचा लागे ना अंत (२)
स्वप्नात आले माझ्या गुरुदेवदत्त lyrics marathi, swapnat aale majhya gurudev datta lyrics in marathi, boli marathi, lyrics in marathi, guruvaar, दत्त आरती, दत्ताची आरती