तंदुरी चिकन Tandoori Chicken
साहित्य :
१ मोठं अखंड चिकन, १ वाटी घट्ट दही, २ कांदे, २ चमचे लिंबाचा रस, ५-६ बेडगी मिरच्या, ८-१० काश्मिरी मिरच्या, ५-६ लसणाच्या पाकळ्या, २ चमचे आले, २ चमचे तंदुरी मसाला, १ चमचा गरम मसाला, बटर आणि मीठ
कृती :
चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला मोठ्या चिरा मारून घ्याव्या.
कांदे सोलून त्यांना तेल लावून ते तवा किंवा गॅसवर भाजून घ्यावे.
तव्यावरच थोड्या बटर + तेलामध्ये दोन्ही मिरच्या,लसूण, आले आणि मसाले चांगले परतून घ्यावे.
नंतर कांदा आणि परतलेले हे साहित्य एकत्र करून चांगले बारीक वाटून घ्यावे.
लालसर रंगाची साधारण दोन वाट्या एवढी हि पेस्ट तयार होईल. आता घट्ट दह्यात हे मिश्रण आणि मीठ चांगले कालवून घ्यावे. आणि फेटावे.
हि पेस्ट चिकनला चांगली चोळून घ्यावी. चिरांमध्ये आतपर्यंत भरावी. हे चिकन दोन तास तरी मॅरीनेट करावे.
ओव्हनमध्ये चांगले खरपूस भाजून घ्यावे. कोळश्याची शेगडी असल्यास त्यावर हि भाजता येईल.
भाजताना थोडे बटर सोडत राहावे आणि कापलेले लिंबू आणि कांदा यांच्यासोबत गरम गरम तंदुरी चिकन (tandoori chicken recipe in marathi) सर्व्ह करावे.
tandoori chicken, tandoori chicken recipe, chicken recipe marathi, nonveg recipe in marathi, non veg, nonveg, chicken recipes indian, chicken tikka masala, tandoori chicken kasa banvaycha, tandoori kashi banvaychi, chicken recipe in mararthi