चहा | Indian Tea Recipe

चहा ( Tea )

चहाशिवाय आमचे अजिबात पान हलत नाही असे म्हणणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. खरं तर चहाचा शोध कसा कुठे कोणी लावला, या पेक्षा चहा जास्त चांगला कोण बनवतं, पाण्याचा कि दुधाचा, आलं टाकावं कि नाही हे प्रश्न कोणत्याही चहा प्रेमीला आधी महत्वाचे वाटतात. 

म्हणूनच झटपट, सोपा तरी एकदम एनर्जी देणारा चहा कसा बनवावा (how to make indian tea) , याची सोपी रेसिपी इथे आम्ही देत आहोत. 

chaha recipe indian tea recipe in marathi boli marathi
चहा recipe

साहित्य : 

दिड कप पाणी, अर्धा कप दूध, तीन चमचे साखर आणि दोन चमचे चहा पावडर 

कृती : 

चहासाठी पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात साखर घालावी आणि चहा पावडर टाकावी.

एक उकळी आल्यावर चहा झाकून ठेवावा.

दोन मिनिटांनी चहा गाळून घ्यावा आणि त्यात गरम दूध घालून कपामध्ये द्यावा. 

खास टिप्स : 

* पावसाळा किंवा थंडीमध्ये चहामध्ये थोडा मसाला घातल्यास चहा आणखी चवदार होतो. हा मसाला बाजारात  महाग मिळतो. चहाचा मसाला घरी करण्यासाठी अर्धा चमचा सुंठपूड, पाव चमचा वेलदोडा पुड, दोन लवंगांची पुड एकत्र करून ठेवावी. आणि यातला किंचित मसाला चहा करतांना घालावा. 

* चहा करतांना आले ठेचून घातल्यास चव आणखी चांगली होते. आले घातल्यावर दूध फाटू नये या साठी दूध नेहमी गरमच वापरावे. आणि चहा ढवळत राहावा. म्हणजे आल्यामुळे चहा फाटत नाही. 

Scroll to Top