क्रिम ऑफ टोमॅटो सूप
साहित्य :
१ कांदा बारीक चिरून, ५ अक्खे टोमॅटो, २ चमचे हिरवी मिरची बारीक चिरून, १ चमचा आले लसूण पेस्ट, दिड वाटी क्रिम, १ वाटी दूध, १ चमचा मिरपूड, एक चमचा साखर, थोडे बटर किंवा लोणी आणि चवीनुसार मीठ
कृती :
टोमॅटो उकळत्या पाण्यात घालावे. आणि दोन मिनिटे झाकून ठेवावे. नंतर बाहेर काढून त्यांची साले काढून घ्यावी. टोमॅटोचा केवळ गर घ्याव्या आणि बिया बाजूला कराव्या.
एका पॅनमध्ये बटर किंवा लोणी तापवावे. त्यात कांदा, आले लसूण चांगले परतून घ्यावे. मिरची आणि टोमॅटो हि त्यात टाकून चांगले परतून घ्यावे.
गॅस बंद करून हे मिश्रण थंड करावे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
ते वाटण पुन्हा एका पॅनमध्ये काढून एक चांगली उकळी येऊ द्यावी.नंतर त्यात दूध, क्रिम, साखर, मीठ आणि मिरपूड घालावी आणि आणखी एक चांगली उकळी येऊ द्यावी.
तळलेले ब्रेडचे तुकडे आणि वरून थोडे क्रिम टाकून हे सूप गरमा गरम सर्व्ह करावे.
खास टिप्स :
* आयत्या वेळेस ब्रेड नसल्यास हे सूप सर्व्ह करतांना टोस्ट किंवा रस्कचे तुकडे किंचित तुपावर शेकून द्यावे. खूप चविष्ट लागतात.