वऱ्याचे तांदूळ 

वऱ्याचे तांदूळ 

साहित्य: 

अर्धी वाटी वऱ्याचे  तांदूळ, पाव वाटी दाण्याचा कूट, एक दोन चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, तीन चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ

कृती : 

जाड बुडाच्या पातेल्यात नेहमीसारखी तुपात जिऱ्याची फोडणी करून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. आता त्यात धुवून निथळलेले वऱ्याचे तांदूळ घालावे आणि एक दोन मिनिट चांगले परतून घ्यावे. 

दाण्याचे कूट हि त्यात घालून चांगले परतून घ्यावे. एक वाटी पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवावे. मंद आचेवर हे तांदूळ शिजवून घ्यावे. तीन चार मिनिटांनी झाकण काढून मीठ आणि आणखी पाणी घालून पुन्हा झाकण ठेवावे. 

झाकणावर हि थोडे पाणी ठेवून हे तांदूळ आता शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करून लगेच झाकण न काढता, आतील वाफेवर हे तांदूळ उमलू द्यावे. 

खास टिप्स :

* वऱ्याचे तांदूळ किंवा भगर सध्या भातासारखी सुद्धा करता येते आणि अशी भगर दाण्याच्या आमटीसोबत खूप छान लागते.