क्विनोआ (Quinoa) आधुनिक सुपरफूडची ओळख, फायदे आणि सोप्या रेसिपीज
आजकाल हेल्दी खाण्याबद्दल जागरूकता खूप वाढली आहे. आपण जे खातो ते आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतं, हे आता सगळ्यांना समजलं आहे. अशाच हेल्दी पर्यायांमध्ये एक नाव खूप चर्चेत आहे क्विनोआ (Quinoa)
पण नेमकं क्विनोआ काय आहे? ते कसं खायचं? आणि त्याचे फायदे काय आहेत? आज आपण याच विषयावर सविस्तर माहिती पाहूया, सोबत दोन सोप्या आणि चविष्ट रेसिपीजही शिकूया.
क्विनोआ म्हणजे काय?
क्विनोआ हा एक प्रकारचा “pseudo-grain” आहे, म्हणजे तो दिसायला धान्यासारखा असला तरी तो प्रत्यक्षात एक बी (seed) आहे. तो मुख्यतः दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये (जसे पेरू, बोलिव्हिया) पिकवला जातो.
भारतात हा पदार्थ काही वर्षांपासून लोकप्रिय झाला आहे, कारण तो अत्यंत पौष्टिक आहे आणि “superfood” म्हणून ओळखला जातो.
क्विनोआ ग्लूटेन-फ्री असतो, त्यामुळे ज्यांना ग्लूटेनची अॅलर्जी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

क्विनोआचे आरोग्यदायी फायदे
1. प्रोटीनचा उत्कृष्ट स्रोत
क्विनोआमध्ये सर्व आवश्यक amino acids असतात, त्यामुळे तो पूर्ण प्रोटीन देणारा पदार्थ आहे. शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
2. वजन कमी करण्यास मदत
यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.
3. पचनासाठी फायदेशीर
फायबरमुळे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
4.डायबेटीस कंट्रोल
क्विनोआचा glycemic index GI कमी आहे, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
5. हृदयासाठी चांगला
यामध्ये magnesium, potassium सारखे minerals असतात जे हृदय निरोगी ठेवतात.
क्विनोआ कसं तयार करायचं?
क्विनोआ बनवण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या (थोडा कडवटपणा कमी होतो).
1 कप क्विनोआसाठी 2 कप पाणी वापरा
10-15 मिनिटे शिजवल्यावर तो फुलून मऊ होतो
रेसिपी 1: क्विनोआ स्नॅक (Crispy Quinoa Cutlets)
साहित्य
* 1 कप शिजवलेला क्विनोआ
* 1 उकडलेला बटाटा
* 1/2 कप किसलेलं गाजर
* 2 टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स
* 1 हिरवी मिरची (चिरलेली)
* 1/2 टीस्पून गरम मसाला
* मीठ चवीनुसार
* कोथिंबीर
* तेल shallow fry साठी
कृती:-
1. एका बाउलमध्ये क्विनोआ, बटाटा, गाजर, मिरची आणि मसाले घालून मिक्स करा
2. त्याचे छोटे कटलेट तयार करा
3. पॅनमध्ये थोडं तेल घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा
गरमागरम कटलेट्स हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा
खास टिप
Air fryer मध्येही हे कटलेट्स बनवू शकता अधिक हेल्दी ऑप्शन!
रेसिपी 2: क्विनोआ खिचडी (Quick & Healthy)
जेव्हा तुम्हाला काहीतरी हलकं, पटकन शिजणारं आणि पौष्टिक खायचं असतं तेव्हा हि क्विनोआ खिचडी तुम्ही नक्की बनवून बघू शकतात. .
साहित्य:-
* 1/2 कप क्विनोआ
* 1/4 कप मूग डाळ
* 1 लहान कांदा
* 1 टोमॅटो
* 1/2 कप भाज्या (गाजर, मटार, बीन्स)
* 1 टीस्पून जिरे
* 1/2 टीस्पून हळद
* 1 टीस्पून तूप
* मीठ चवीनुसार
* पाणी
कृती:-
1. कुकरमध्ये तूप गरम करा, त्यात जिरे घाला
2. कांदा परतवा, नंतर टोमॅटो आणि भाज्या घाला
3. धुतलेला क्विनोआ आणि मूग डाळ घाला
4. हळद, मीठ आणि पाणी घालून 2-3 शिट्ट्या द्या
गरमागरम खिचडी तुपासोबत सर्व्ह करा
खास टिप:-
क्विनोआ खिचडीवर लिंबाचा रस घातल्यास चव अजून छान लागते
आपण रोजच्या आहारात छोटे-छोटे बदल करून मोठा फरक करू शकतो. तांदूळ किंवा गव्हाच्या ऐवजी कधीतरी क्विनोआ वापरणे ही एक चांगली सवय ठरू शकते.
सुरुवातीला कदाचित त्याची चव वेगळी वाटेल, पण हळूहळू ती आवडू लागते.
आजच या दोन्ही रेसिपीज करून पाहा आणि हेल्दी खाण्याचा एक नवा प्रवास सुरू करा.
अजून अशाच हेल्दी रेसिपीज आणि आर्टिकल्ससाठी बोली मराठीला व्हिजिट करत राहा.
क्विनोआ, क्विनोआ म्हणजे काय, quinoa, quinoa recipes, क्विनोआ खिचडी, क्विनोआ रेसिपीज, boli marathi, superfood, healthy food,