उन्हाळ्यातील वाळवणं भाग २

उन्हाळ्यातील वाळवणं भाग २

उन्हाळा आला की घरात एक वेगळीच लगबग सुरू होते. कुठे पापड लाटले जातात, कुठे लोणच्याच्या बरण्या भरल्या जातात, तर कुठे मोठ्या चाळणीत वेगवेगळे पदार्थ उन्हात वाळत ठेवलेले दिसतात. वाळवणं ही फक्त साठवणीची पद्धत नाही, तर आपल्या घरगुती संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

भाग १ मध्ये आपण पापड, कुरडया, सांडगे, वेफर्स आणि लोणच्याबद्दल पाहिलं. आता भाग २ मध्ये पाहूया आणखी काही खास आणि चवदार वाळवणांचे प्रकार, जे अनेक घरांत अजूनही प्रेमाने केले जातात.

unhali vaalvan recipes part 2 in marathi boli marathi

१. शेवया – गोड आणि तिखट पदार्थ दोन्हीसाठी उपयोगी

उन्हाळ्यात घरी शेवया बनवणे हा अनेक घरांचा खास कार्यक्रम असतो. गव्हाच्या पिठाच्या किंवा रव्याच्या शेवया करून उन्हात वाळवल्या जातात. काही ठिकाणी त्यात साजूक तुपाचा हि वापर केला जातो. 

 शेवया कशासाठी वापरतात?

* दुधात शिजवून गोड शेवया बनवायला 
* उपमा प्रकार
* मसाला शेवया

शेवया का खास आहेत?

* बाजारातील  शेवयापेक्षा घरगुती चव वेगळी असते 
* वर्षभर टिकतात
* पटकन नाश्ता किंवा गोड पदार्थ तयार होतो

२. खारोड्या

खारोड्या हा पारंपरिक आणि थोडा कमी परिचित प्रकार आहे, पण ग्रामीण भागात आजही लोकप्रिय आहे.

खारोड्या  कशापासून बनतात?

तांदूळ किंवा इतर धान्याच्या पिठापासून मसाले घालून हे मिश्रण बनवलं जातं आणि लहान आकारात गोळे थापून वाळवलं जातं.

खारोड्या कशा खातात?

* तेलात तळून
* भाजीसोबत साईड डिश म्हणून

खारोड्याची खासियत:

* कुरकुरीत
* मुलांना आवडणारा पदार्थ
* साठवण सोपी असते 

३. टोमॅटो वाळवण

आजकाल अनेक घरांत नवीन प्रयोग म्हणून टोमॅटो वाळवण केलं जातं. पिकलेले टोमॅटो कापून मीठ आणि मसाला लावून उन्हात वाळवले जातात.

वाळलेल्या टोमॅटोचा उपयोग:

* भाजीमध्ये
* पास्ता / सँडविचमध्ये
* चटणीत

वाळलेल्या टोमॅटोचे फायदे:

* चव गोड-आंबट लागते
* वेगळा स्वाद मिळतो
* पदार्थात रंग आणि टेस्ट वाढते

४. कारल्याचे काप

कारलं अनेकांना आवडत नाही, पण वाळवून केलेले कारल्याचे काप खूप चवदार लागतात.

कसे बनवतात?

कारलं पातळ चिरून त्यात मीठ लावतात. थोडा वेळ ठेवून पाणी काढतात आणि उन्हात वाळवतात.

कसं खायचं?

* तेलात परतून
* कुरकुरीत तळून
* डाळ-भातासोबत

५. मिरची वाळवण

हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या वाळवून ठेवण्याची पद्धत अनेक घरांत आहे.

वाळलेल्या मिरचीचा उपयोग:

* फोडणीसाठी
* मसाला बनवण्यासाठी
* चटणीसाठी

वाळलेल्या मिरच्या का उपयुक्त?

* वर्षभर मिरच्या उपलब्ध
* चव तीव्र आणि छान
* स्वयंपाकात पटकन वापरता येतात

पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळं नियोजन करून वाळवणं करत असत. कोणत्या दिवशी पापड, कोणत्या दिवशी शेवया, कोणत्या दिवशी लोणचं सगळं ठरलेलं असायचं. 

आजही अनेक महिला घरगुती वाळवणं तयार करून छोटा व्यवसाय सुरू करत आहेत.

घरी बनवलेल्या वाळवणातून व्यवसाय कसा करू शकतात?

घरच्या घरी बनवलेले पदार्थ लोकांना आवडतात. तुम्ही हे प्रकार विक्रीसाठीही तयार करू शकता.

जसं:

* घरगुती शेवया
* पापड
* कुरडया
* लोणचं
* मसाला वाळवणं

या उत्पादनांची विक्री कुठे करावी?

* व्हॉट्सअ‍ॅप
* इंस्टाग्राम
* स्थानिक बाजार
* ओळखीतील ग्राहक

या सगळ्यामार्फत घरी बनवलेले वाळवणांचे प्रकार तुम्ही विकू शकतात आणि त्यातून नफा कमावू शकतात. 

उन्हाळ्यातील वाळवणं म्हणजे फक्त पदार्थ साठवणं नाही, तर वेळ, प्रेम, कष्ट साठवणं आहे.

एकेक वाळवणात पिढ्यानपिढ्यांची चव दडलेली असते.

भाग ३ मध्ये आपण पाहू – मेथी वाळवण, कांदा लसूण साठवण, कैरी मसाला, मसालेदार सुक्या भाज्या आणि ग्रामीण भागातील खास प्रकार.

हे पण वाचा: 

उन्हाळी वाळवण पदार्थ भाग १

Scroll to Top