विठ्ठलाची आरती | Vitthal Aarti in Marathi

विठ्ठलाची आरती

“युगे अठ्ठावीस विटेवरी उभा…” ही विठ्ठलाची आरती महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी भक्ताच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज ही आरती भक्तिभावाने गायली जाते.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या काळात लाखो वारकरी एकाच स्वरात ही आरती गातात, तेव्हा भक्तीचा अविस्मरणीय अनुभव निर्माण होतो.

vitthal aarti lyrics in marathi boli marathi

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। जय देव जय देव ।। धृ० ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा । राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती । दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती । दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।

आरती संग्रह:- 

शंकराची आरती 

देवीची आरती 

गणपतीची आरती 

Scroll to Top