दुर्गा देवीची आरती 

दुर्गा देवीची आरती 

देवीची ‘ दुर्गे दुर्घट भारी’  हि आरती आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेच. 

त्याच आरतीचे शब्द इथे देत आहोत. 

devichi aarti lyrics in marathi boli marathi
देवीची आरती 

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी  ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी  ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी  ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ ॥

Scroll to Top