चटणी पुडी 

चटणी पुडी 

साहित्य : 

एक वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी चणा डाळ, एक वाटी कढीपत्ता पाने, १५-२० बेडगी मिरच्या, एक चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, छोटे चिंचेचे बुटुक, मीठ आणि खोबरेल तेल 

कृती : 

तेलावर साहित्यात दिलेल्या सगळ्या गोष्टी (चिंच, हिंग सोडून) वेगवेगळ्या, मंद आचेवर खमंग भाजून घ्याव्या आणि थंड झाल्यावर एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. 

याला पाण्याचा हात लागू देऊ नये. नाही तर चटणी जास्त टिकत नाही. 

Scroll to Top