तिळाची चटणी 

तिळाची चटणी 

साहित्य : 

एक वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धी वाटी कढीपत्ता पाने, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग आणि तेल 

कृती : 

लहान कढईत तीळ मंद आचेवर भाजून घ्यावे. भाजतांना सतत हलवत राहावे म्हणजे तीळ जळणार नाही. तिळाचा रंग बदलून छान वास आला कि तीळ खाली ताटलीत उतरवून घ्यावे. 

सुक्या खोबऱ्याचा किस त्याच कढईमध्ये मंद आचेवर भाजावा. तो काढून त्याच कढईत चमचाभर तेल घालून त्यावर कढीपत्ताची पाने परतून ताटलीत काढून घ्यावी. 

हे सर्व साहित्य थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्यावे.