शिंगाडा पिठाचे लाडू | Shingada Flour laddoo for upwas

उपवासासाठी शिंगाडा पिठाचे लाडू

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला गोड खायला आवडत असेल तर हे नक्की वाचा.  आज अगदी सोप्या पद्धतीने बनणारे शिंगाड्याच्या पिठाचे लाडू कसे बनवावे याची कृती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. 

तेव्हा या वेळी उपवासाला हे लाडू नक्की बनवून बघा. 

shingadyache laadu recipe in marathi boli marathi
शिंगाड्याच्या पिठाचे लाडू कसे बनवावे

साहित्य :

ingredient for shingada laddoo for fasting upwas

घट्ट तूप ८ चमचे, शिंगाडा पीठ २ वाटी, पिठीसाखर अर्धा वाटी, वेलची पावडर अर्धा चमचा, सुक खोबरे अर्धा वाटी ( भाजून बारीक किसून )

कृती :

how to make shingada flour laddoo

गॅस मध्यम आचेवर ठेवा. त्यावर कढई ठेवा.

कढईत घट्ट तूप गरम करून त्यात शिंगाडा पिठ भाजून घ्या.

चांगले खरपूस भाजल्यानंतर त्यात किसलेले खोबरे, वेलची पावडर आणि पिठीसाखर टाकावी. 

लाडू चांगले वळून घ्यावेत. 


खास टीप :

साखरेचा किंवा गुळाचा पाक करून पिठीसाखरेऐवजी वापरू शकता. लाडू घट्ट बनतात. 

Scroll to Top