कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावे | How to make sabudana vada at home

कुरकुरीत साबुदाणा वडे

साहित्य :

मीडियम साइज साबुदाणा 1 कप भिजलेला, बटाटे 5 उकडलेले, दाण्याचे कूट ½ कप , कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरलेल्या, आलं पेस्ट 1 लहान चमचा, काळे मिरे – 8 ते 10 (पूड करून, ऐच्छिक ), तेल तळण्यासाठी

कृती :

how to make sabudana vada at home fasting recipe

सर्वप्रथम 1 कप साबुदाण्याला 1 कप पाण्यात दोन तासासाठी भिजवून ठेवा. आणि नंतर त्याचे पाणी निथळून त्याला ४-५ तासासाठी झाकून ठेवा. रात्रभर झाकून ठेवल्यास साबुदाणा चांगला फुलतो आणि हलका होतो. 

बटाटे सोलून चांगल्या प्रकारे मॅश करून घ्या.  मॅश केलेल्या बटाट्यात साबुदाणा घालावा.

नंतर त्यात मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं पेस्ट, तिखट, काळे मिरे पूड (ऐच्छिक), बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दाण्याचे कूट घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे.

कढईत तेल घालून गरम करा. मिश्रणातून थोडे मिश्रण काढून गोल करून हाताने दाबून चपटे करावे, तयार वड्याला प्लेटमध्ये ठेवावे, या प्रकारे सर्व मिश्रणाचे वडे तयार करा. नंतर वडे तळून घ्यावे.

गरमा गरम साबूदाण्याच्या वड्यांना हिरवी चटणी, गोड चटणी सोबत सर्व्ह करावे.  

1 thought on “कुरकुरीत साबुदाणा वडे कसे बनवावे | How to make sabudana vada at home”

Comments are closed.