उपवासाची खमंग शेंगदाणा आमटी | Upvasachi shengdana amti

खमंग शेंगदाणा आमटी

साहित्य :

१ वाटी दाण्याचे कूट, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ आमसुले, चवीप्रमाणे मीठ, साखर किंवा गूळ, २ लवंगा, १ दालचीनीचा तुकडा

कृती :

upwasachi shengdana amti kashi banvavi

दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या, लवंगा, दालचिनी यांच्यासोबत पाटयावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या.

नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व साखर घाला.

आमटी उकळण्यास ठेवा. तुपात जिर्‍याची फोडणी करुन आमटीत घाला.

खास  टीप :

  • वेगळ्या चवीसाठी आमसुलांऐवजी ताक किंवा दही देखील वापरु शकता.