खमंग शेंगदाणा आमटी
साहित्य :
१ वाटी दाण्याचे कूट, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ आमसुले, चवीप्रमाणे मीठ, साखर किंवा गूळ, २ लवंगा, १ दालचीनीचा तुकडा
कृती :
upwasachi shengdana amti kashi banvavi
दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या, लवंगा, दालचिनी यांच्यासोबत पाटयावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या.
नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व साखर घाला.
आमटी उकळण्यास ठेवा. तुपात जिर्याची फोडणी करुन आमटीत घाला.
खास टीप :
- वेगळ्या चवीसाठी आमसुलांऐवजी ताक किंवा दही देखील वापरु शकता.