असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । Asava sundar chocolate cha bangla lyrics

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

लहानपणीचे जग हे रंगीबेरंगी आणि सुंदर असते. अश्या वेळेस छान गोड गोड चॉकोलेटचे आपले घरच असले तर? हि कल्पना किती भन्नाट आहे ना. 

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे. त्याच बालगीताचे lyrics इथे देत आहोत. 

asava sundar chocoletcha bangla lyrics in marathi boli marathi

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

Scroll to Top