वांग्याच भरीत | Vangyache Bharit Recipe

वांग्याच भरीत

साहित्य:

 १ मोठ भरताच वांग, २ मोठे कांदे, २-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ मोठी वाटी दही, तेल,  मीठ, पांढरे तीळ 

कृती:

वांग्याला थोडेसे तेल लावून घ्यावे. शेगडीवर ठेवून सर्व बाजूंनी भाजून घ्यावे.

भाजले की शेगडीवरून बाजूला करून ५ मिनिटे झाकून ठेवावे. साल काढून घ्यावी चमच्याने कुस्करून घ्यावे.

कुस्करलेल्या वांग्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पांढरे तीळ व मीठ घालून एकजीव करून  घ्यावे.

चांगले एकजीव झाले की त्यात दही घालावे. चांगले मिक्स करून घ्यावे. गरमा गरम भाकरीसोबत खायला  द्यावे.

vangyache bharit, baigan bharta recipe in marathi, marathi recipes,